मा. सतिश मराठे
संचालक, रिजर्व बँक ऑफ इंडिया
"हे सांगण्यास आनंद होत आहे कि ह्या संस्थेचे व्यवस्थापन अतिशय सुंदर आहे . आणि ही संस्था ग्रामीण भागात देत असलेली आर्थिक सेवा अतिशय उल्लेखनीय आहे .संस्थेस भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...!"
२८ डिसेंबर २०२२
डॉ. उदय जोशी
राष्ट्रीय महामंत्री, सहकार भारती
"आज महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सह.पतसंस्थेस भेट देण्याचा योग आला. अल्पावधीत संस्थेने केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचे अनोखे अनोखे दर्शन झाले महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांनी अनुकरण केल्यास पतसंस्थांची प्रतिमा समाज्यामध्ये उज्वल होऊ शकते."
२८ डिसेंबर २०२२
मा. विवेक दिनकर जुगादे
महामंत्री, सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश
"वीराचार्य जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे .अल्पावधीत संस्थेने केलेली प्रगती संपूर्ण महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक आहे .संस्थेची सामाजिक बांधिलकी स्पृहणीय आहे . संस्थेच्या भावी दमदार वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!"
२८ डिसेंबर २०२२
डॉ. सौ.शाशिताई अहिरे
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती
"आपल्या संस्थेची रम्य प्रभातकाळी झालेली भेट ही माझ्या महाराष्ट्र प्रदेश सहकारी भारती अध्यक्ष ह्या कामासाठीची सुरवात ही अत्यंत प्रसन्नमय झाली . आपल्या संस्थेचे काम हे लक्षणीय आहे. संचालक व संबंधित स्टाफ यांचे devotion खूपच सुंदर आहे . माझ्या नविन प्रवासाची सुरवात छान झाली ह्याबद्धल धन्यवाद"
२७ डिसेंबर २०२२
मा. सुभाष देशमुख
माजी. सहकार मंत्री, महारष्ट्र राज्य
"२५ व्या वर्षात पदार्पण करत असताना खूप शुभेच्छा आपली संस्था सामाजिक उपक्रम राबवत आहे त्याबद्धल चेअरमन व संचालक यांचे खूप खूप अभिनंदन .अशीच महाराष्ट्राची सेवा आपल्या हातून व्हावी हीच सदिच्छा"
२२ जुलै २०१७
मा. शेखर चरेगावकर
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद
"आज पतसंस्थेस भेट देण्याचा योग आला तसे पतसंस्थेशी माझे १५ वर्षापासूनचे नाते आहे.पतसंस्थेचे अध्यक्ष, माझे सहकारी श्री. राजोबा सर व सर्व संचालक अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात. संस्थेची विश्वसहर्ता समाजात वाढत आहे.संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. मसुटगे व सहकारी कर्मचारी संस्थेच्या प्रगतीमध्ये देत असलेले योगदान कौताकास्पद आहे .या सर्व संगमामुळे संस्था दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहेच व अन्य पतसंस्थांना मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. संस्थेस शुभेछा"
७ फेब्रुवारी २०२०
मा. सुधीर गाडगीळ
आमदार, महाराष्ट्र राज्य
"आज प्रथमच संस्थेत आलो , व्यवस्थापन व काम खूप चांगले आहे. आर्थिक व्यवहारासोबत सामाजिक कार्य सुद्धा कौतुकास्पद आहे."
२२ जुलै २०१७
मा. श्री. शैलेश कोतमिरे
अप्पर निबंधक, महाराष्ट्र राज्य सह. आयुक्त कार्यालय
"आज रोजी संस्थेस प्रत्येक्ष भेट देण्याचा योग आला. संस्थेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेत सर्वसामान्य सभासदाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात संस्थेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे . संस्थेचे भवीतव्य अत्यंत उज्वल आहे.संस्थेच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा."
२० जानेवारी २०१४
मा. श्री. ए.डी. पाटील
व्यवस्थापक, जगवल्लभ पतसंस्था सांगली
"आज रोजी संस्थेस प्रत्येक्ष भेट देण्याचा योग आला.संस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेले काम इतर सहकारी संस्थाना आदर्श घेण्यासारखा आहे.सहकारातील वाटचालीमध्ये दिपस्तंभ सारखे या संस्थेचे काम आहे. संस्थेच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा."
अज्ञात तारीख
मा. श्री. किरणसिंह पाटील
जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग -१, सहकारी संस्था सांगली
"संस्थेस ६९-अ तपासणी अनुषंगाने भेट देण्याचा योग आला .संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असून संस्थेचे सामाजिक कार्य सुद्धा अतिशय कौतुकास्पद आहे. शैक्षणिक , समाजिक तसेच आर्थिक कार्यास शुभेच्छा"
अज्ञात तारीख