वार्तांकन
वीराचार्य पतसंस्थेशी संबंधित बातम्या आणि वार्ता.
सहकार भारतीचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने वीराचार्य पतसंस्था सन्मानीत ...!

सांगली : देश पातळीवर २७ राज्यामधून सहकार संवर्धनाचे ४० वर्षापासून अधिक काळ कार्य करणाऱ्या सहकार भारती या संस्थेच्या दिल्ली येथील पतसंस्थांच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सांगली येथील प्रथितयश वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेस राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करणेत आले. १० हजार पतसंस्था प्रतिनिर्धीच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा. भागवत कराड यांच्या शुभहस्ते, बुलढाणा अर्बन सोसायटीचे संस्थापक मा. राधेशामजी चांडक, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटक मा. उदयजी जोशी, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे चेअरमन मा. एन. जे. पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव व संस्थेचे संचालक मा. श्री. शशिकांत राजोबा, तसेच संस्थेचे संचालक मा. श्री. मोहन नवले, डी के पाटील व व्यवस्थापक मा. शितल मसुटगे यांनी हा पुरस्कार स्विकारला. विना संस्कार नहीं सहकार या ब्रिद वाक्याने कार्यरत असलेली सहकार भारती ही संस्था सहकारातून समृध्दि व सामाजिक विकास करण्याकरीता अग्रेसर आहे. अशा सहकार भारती आयोजित देशातील सर्व पतसंस्थाचे राष्ट्रीय अधिवेशन राजधानी दिल्ली येथे दिनांक २ व ३ डिसेंबर रोजी संपन्न झाले. यावेळी देशभरातील ' पतसंस्थांचेकडून प्राप्त प्रस्तावांचे विविध निकषांव्दारे परीक्षण, निरीक्षण करून महाराष्ट्र राज्यातून वीराचार्य पतसंस्थेस हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देणेत आला. संस्थेने विधायक अर्थकारणाबरोबरच सजग समाजकारणासह कोरोना, अवर्षण, महापूर यासारख्या आपत्तीप्रसंगी केलेल्या कार्याची रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान कार्याप्रमाणेच अनाथाश्रम, वृध्दाश्रम येथे साहित्य वाटपाबरोबरच वीराचार्य लेक वाचवा अभियान योजना, जीवन सुरक्षा, दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून जपलेल्या सभासद, ग्राहक, समाजाप्रतीच्या उत्तरदायित्वाची नोंद घेवून सेवेचा संस्कार जपणाऱ्या अर्थपूर्ण कृतीबद्दल हा पुरस्कार मिळालेने संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सहकार समर्पित व्यक्तित्वाला पुरस्काराचे सुवर्ण कोंदण !

सहकार समर्पित व्यक्तित्वाला पुरस्काराचे सुवर्ण कोंदण ! आपल्या मूल्याधिष्ठित-सेवाधिष्ठित-समाजाधिष्ठित कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात विशेषत: सहकारी पतसंस्था क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाèया महाराष्ट्रातील 19846 नागरी सहकारी पतसंस्थाची शिखर संस्था असणाèया-पतसंस्थाच्या मूलभूत प्रश्न समस्या अडचणी निराकरणाचा निरंतर प्रयास करणाèया पतसंस्था चळवळीच्या अस्तिव अस्मितेच्या दृष्टीने दिशादर्शक संघर्षशील कार्य करणाèया महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या राज्यस्तरीय संस्थेचे विद्यमान संचालक तथा महासचिव श्री.शशिकांत राजोबा यांची बिझनेस एक्सप्रेस श्री फौंडेशनच्या रौप्यमहोत्सवी राज्यस्तरीय सहकार श्री या पुरस्कारासाठी झालेली सन्माननीय निवड ही त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यावर पंसतीची मोहोर उमटविण्याप्रमाणेच पतसंस्था क्षेत्राच्या नावलौकिकात भर घालणारी घटना म्हणावी लागेल.तव्दतच सहकार पंढरीच्या वारकèयाला या पुरस्काराच्या माध्यमातून सुवर्ण कोंदण लाभल्याचे वास्तव म्हणावे लागेल. श्री.शशिकांत राजोबा यांना सहकार विचारांचा उपजत वारसा त्यांच्या घराण्यातूनच लाभला, मात्र केवळ वारसा न सांगता सहकारातील ध्यास, प्रयास, अभ्यासाच्या बळांवर आपल्यातील सहकारभान जागवीत सहकाराची व्यापक संकल्पना जनमनांमध्ये रूजविण्याच्या कार्यात विधायक अर्थकारणाला सजग समाजकारणाची जोड देत वीराचार्य पतसंस्था सक्षम, समर्थ करण्याच्या सर्वांगिण विकासवृध्दी, गती, प्रगतीचे आधारवड ठरण्याच्या कार्यात सहकार सांगाती बनून सहकारीता सत्फलाय हे सहकार मूल्यजपण्यासाठी समाज जीवनात अर्थपूर्ण परिवर्तन घडविण्याठी पतसंस्था संचलनासह सहकार संक्रमण काळात सहकार परिषद, सेवक प्रक्षिक्षण, कार्यशाळा सहकार विचार संगोष्ठी, सहकार रॅलीचे यशस्वी आयोजन याबाबी त्यांची सहकाराबद्दलची प्रतिबध्दता अधोरेखित करणाèया आहेत. याचप्रमाणे वीराचार्य सल्लागार ते जिल्हा पतसंस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन सहकार भारती प्रांत उपाध्यक्ष व सध्याच्या महासचिव पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष ठरावी असे म्हणावे लागेल. परिजन, परिवार, प्रागतिक परिसर समृध्दीसाठी सहकाराच्या विचाराची कास धरीत सहकाराची संपन्न विचारधारा आत्मसात करीत अवघे धरू सुपंथ ही सहकार संकल्पना मानून नाविन्याचा ध्यास, नियमांचा सखोल अभ्यास, समन्वयातून समस्या निराकरणाचा प्रयास या त्यांच्या कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून केलेले सहकारातील कार्य हे दिशादर्शक ठरणारे आहे. वीराचार्य अर्थसंस्थेने त्यांच्या नेतृत्वाने घेतलेली अर्थभरारी ही त्याची प्रचिती होय. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या मते सहकार ही पवित्र वेदि असून तीच्या संवर्धन, संचलन, सरंक्षणासाठी सुशिक्षीत संस्कारित नेतृत्वाची निकड भासते अशी त्यांची धारणा ही राजोबा सरांसारख्या सहकार समर्पित संस्कारक्षम युवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही अंशी पूर्णत्वास यावी असे वाटते. श्री.राजोबा यांनी स्वत: सहकार सांगाती बनत सांगली जिल्ह्यातील सुमारे 300 पतसंस्थाना मार्गदर्शक दिशादर्शक ठरणाèया सहकार परिषेदेचे आयोजन तत्कालीन सहकार मंत्री, फेडरेशन पदाधिकारी, सहकार खाते यांच्या उपस्थितीत करून पतसंस्था काल आज उद्या, पतसंस्थेसमोरील आव्हाने अशा प्रबोधनात्मक चर्चा चिंतन मंथनाने फलदायी घडवली आहे. इतकेच नव्हे अडचणीतील पतसंस्था विलीनकरणाच्या माध्यमातून पतसंस्था संचलन अडचणीचे असले तरी अशक्य नाही, याचा आदर्शवत वस्तूपाठ राजोबा सरांनी आपल्या कृतीतून घालून दिल्याचे वास्तव आहे. श्री. शशिकांत राजोबा यांची 25 हून अधिक वर्षाची पतसंस्था संचलनाची, 20 हून अधिक कालावधीतील सांगली जिल्हा फेडरेशनच्या संचालक म्हणून दिलेल्या योगदानाची, नोंद घेवून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.काका कोयटे यांनी त्यांना फेडरेशन संचालक म्हणून 2015 मध्ये कार्याची संधी दिली त्या संधीचे सोनं करीत पतसंस्था सहकार क्षेत्रातील उर्त्स्फूत सहभाग, दिशादर्शक कार्यप्रणाली, व्यापक जनसंपर्क, संवादासह पतसंस्था फेडरेशनच्या 7 वर्षे संचालक कार्यकालात समस्यांचा केलेला पाठपुरावा समस्या निराकरणाच्या दृष्ठीने केलेले प्रयास, कर्तव्य भावनेेने दिलेले भरीव योगदान स्वरूप पुन:श्च एकदा संचालक पदाप्रमाणेच महत्वपूर्ण महासचिव या पदावर त्यांची सन्माननीय निवड झाली, आणि आज सहकार संक्रमण काळात पतसंस्थेच्या समोरील आव्हाने, आवर्तने यांना सक्षमपणे सामोरे जात वर्तमानात स्वत:ला सिध्द करीत फेडेरेशन अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य पतसंस्थाच्या सहयोगाने समुह कामगीरीने पतसंस्था समस्यांचा जागर घालण्याप्रमाणेच प्रसंगी आंदोलने, रस्त्यावरच्या लढाईसाठीही सक्रीय सहभाग देत प्रश्नाच्या अनुसंधाने सातत्यपूर्ण पाठपूर्वा सकारात्मक कारावाई या माध्यमातुन महासचिव पदाचे दायित्व सक्षमपणे निभावत आहेत, त्याचवेळी सहकार क्षेत्राच्या दृष्टीने जनसामन्यांच्या मनात सहकारभान, सहकार अस्तित्वाची आशा, जगण्याचे नवे बख, आशेचे नवे अंकुर, चांगले होणार असल्याचा आशावाद जागविण्याबरोबरच सहकार हा युगधर्म ठरावा यासाठी सहकार सांगाती म्हणून कार्य करीत आहे. या पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांचे मन:स्वी अंभिनंदन व भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा......... एन. जे. पाटील संचालक, वीराचार्य पतसंस्था, सांगली
अभिनंदनीय निवड

आमचे मार्गदर्शक ,संस्थेचे संचालक मा.शशिकांत राजोबा सर यांची महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशनच्या महासचिव पदी निवड झाले बद्दल हार्दीक हार्दीक अभिनंदन..! . महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या व १७ हजाराहून अधिक सहकारी पतसंस्था सभासद असलेल्या या फेडरेशन चे विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वा खाली सहकार भारतीच्या सहकार्याने सत्ताधारी पानेल तयार करण्यात आले होते . सत्ताधारी पानेलच्या वतीने सहकारातील जाणते ,अभ्यासू श्री. शशिकांत राजोबा सर यांची सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली. व त्यानंतर त्यांची महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशनच्या महासचिव पदी निवड झाली आहे.