वीराचार्य दत्तक पालक योजना
आर्थिक दुर्बळ घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी एक सामाजिक बांधिलकी!
योजनेची माहिती
संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणार्या सभासदांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी हि योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये संस्थेची प्रत्येक शाखा एका मुलीचा पहिली ते दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च करते . यामध्ये शैक्षणिक साहित्य वह्या, पुस्तके, दप्तर ई. समावेश असतो. समाजातील मुलींचे घटते प्रमाण व स्त्रीभ्रनहत्या याला थाबवण्यासाठी मुलींच्या पालकांवरचा मुलीच्या शिक्षणाचा खर्चाचा भार कमी करण्याची आवश्यकता आहे, आणि याचसाठी संस्थेने ही योजना सुरु केली आहे. आजपर्यंत भरपूर मुलीना या अभियानाचा फायदा झाला आहे. या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.
योजनेचे फायदे
- मुलींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी संस्थेकडून घेतली जाते.
- कोणत्याही अटीशिवाय योजनेचा लाभ मिळतो.
- पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करण्याची गरज नाही.
- मुलींना दरवर्षी आधुनिक शैक्षणिक साहित्य मिळते.
अधिक माहितीसाठी संपर्क
दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:
- ९७६३१२७१११
- ९४२११२३४३५
- ८८३०९७५८७१
आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.